प्रकाशाचे अपवर्तन
प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
कंपास मधील प्लास्टिक ची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून हळूहळू तिरकी करून पहा. तुम्हाला प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगात विभक्तिकरण झाल्याचे दिसून येते. प्रकाश विभक्त झा
ल्यानंतर वेगवेगळ्या रंगांचा क्रम तांबडा, नारंगी,पिवळा,हिरवा,निळा, पारवा, जांभळा असा असतो. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तरंग लांबी हा प्रारणांचा महत्त्वाचा गुण आहे. आपले डोळे प्रारणांना संवेदनशील आहे.त्या प्रारणांची तरंग लांबी 400 nm ते 700 nm च्या दरम्यान असते.या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारण आपल्याला वेगवेगळ्या रंगात दिसतात. या तांबड्या रंगाची तरंग लांबी म्हणजे 700 nm च्याजवळ tar जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे 400 nm च्या जवळ असते. निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असतो. परंतु पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असत नाही व त्या निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात. यामुळे माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो.जर पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर आपाती असेल . तरीसुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकशासाठी अपवर्तन कोनाचे माप निरनिराळे असते. म्हणूनच सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाश सुध्दा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपतन करतो तेव्हा तो सात रंगांच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात बाहेर पडतो. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथ्थ करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशा पासून वर्णपंक्ती काचेच्या लोलकाचा (prism)वापर केला जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात.या सात रंगांपैकी लाल रंग सर्वात कमी वेळा वळतो. तर जांभळा रंग सर्वाधिक वळतो. त्यामुळे प्रत्येक रंगाचे किरण वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि विभक्त होतात. इंद्रधनुष्य ही जगातील सर्वात सुंदर घटना असून ती वेगवेगळ्या नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन,आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे.प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतरआकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात.जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबा मध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो.तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडून आणतात नंतर थेंबाच्या आत मध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो. नंतर थेंब च्या आत मध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबाबाहेर येतानात्याचे पुन्हा अपवर्तन होते.या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पहावयास मिळतात.


Nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice blog 👍
ReplyDeleteInformative blog 👍
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteखुप छान माहिती दिलेली आहे.
ReplyDelete