प्रकाशाचे अपवर्तन
ताऱ्यांची आभासी स्थिती
वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणार एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लूकलुकणे होय.
तारे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात व सूर्यप्रकाश नसल्याने आपल्याला रात्री दिसतात. तारे आपल्या पासून जास्त अंतरावर असल्याने ते प्रकाशाचे बिंदुरुप स्त्रोत असल्याचे जाणवते.
वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो. कारण हवेची घनता वाढत जाते .वातावरणातून तारका प्रकाश स्थंभिकेकडे झुकल्यामुळे वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा उंच असल्याचे भासते.
ताऱ्यांची आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत राहते याचे कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल. तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तानंक बदलतो अशा प्रकारे अपवर्तनकांत होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते त्यामुळे ते लुकलुकत असताना दिसतात .
ग्रह
ग्रह आपल्याला लुकलुकत असताना दिसत नाही. याचे कारण ते आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत बरेच जवळ असतात .एक बिंदू स्त्रोत नसून बिंदू स्त्रोतांचा समूह असतात. वातावरणातील बदलत्या स्थिती मुळे यातील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी दिसतात. व त्यांचे स्थानही बदलते .पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच स्थानही स्थिर राहते . त्यामुळे ते लुकलुकत नाहीत.
ग्रह आपल्याला लुकलुकत असताना दिसत नाही. याचे कारण ते आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत बरेच जवळ असतात .एक बिंदू स्त्रोत नसून बिंदू स्त्रोतांचा समूह असतात. वातावरणातील बदलत्या स्थिती मुळे यातील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी दिसतात. व त्यांचे स्थानही बदलते .पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच स्थानही स्थिर राहते . त्यामुळे ते लुकलुकत नाहीत.
वातावरणातील अपवर्तनाचा परिणाम.
सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचे क्षितिजाच्या वर येणे असे आपण म्हणतो. सूर्य खाली असताना त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडलातून येणारा अपवर्तन झाल्यामुळे किमान आपल्यापर्यंत येतो. त्यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसतो. असेच. सूर्यास्ताच्या वेळी घडते. आपल्याला सूर्य क्षितिजा खाली गेला तरीही काही काळ दिसत राहतो.




खूप छान
ReplyDeleteUseful information
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteउत्कृष्ट माहिती आहे.
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteखूप छान! लेखात दिलेली उदाहरणे खूपच मनोरंजक आहेत आणि वाचकांना गुंतवून ठेवतात. मला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणाऱ्या सूर्याची उंची यांवर अपवर्तनाचा कसा परिणाम होतो याची माहिती देणारा भाग खूप आवडला.
ReplyDeleteअत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लेखाची सादरीकरण केले आहे. अप्रतिम लेख....👍
ReplyDelete