प्रकाशाचे अपवर्तन
प्रकाशाचे अपवर्तन प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. अपवर्तनाचे नियम (Law of Refraction) आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदुपाशी (N) असलेल्या स्थंभिकेच्या म्हणजेच CD च्या विरुद्ध बाजूस असतात. व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्ती किरण व स्थंभिका एकाच प्रतलात असतात. अपवर्तनांक (Refractive index): sin I /sin r=स्थिरांक=n n या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात . प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते.ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते . वेगवेगळ्या माध्यामांकरिता तसेच एका माध्यमासाठीही...