प्रकाशाचे अपवर्तन



 प्रकाशाचे अपवर्तन 

            प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात.

अपवर्तनाचे नियम (Law of Refraction)

             आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदुपाशी (N) असलेल्या स्थंभिकेच्या म्हणजेच CD च्या विरुद्ध बाजूस असतात. व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्ती किरण व स्थंभिका एकाच प्रतलात असतात.

               अपवर्तनांक (Refractive index): sin I /sin r=स्थिरांक=n 

                  n या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात .

                       प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते.ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते . वेगवेगळ्या माध्यामांकरिता तसेच एका माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाश किरणांसाठीही अपवर्तनांक वेगवेगळा असतो. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक  अवलंबून असतो.

  वेगवेगळ्या माध्यमांत प्रकाशाचे अपवर्तन 

                          जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमात जातो. तेव्हा तो स्थंभिकीकडे झुकतो.
                          जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्थंभिकेपासून दूर जातो.
                           प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही,अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही 

प्रकाशाचे अपस्करण
 
                             पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या रंगांचा क्रम तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा जांभळा असा असतो.प्रकाश झोताच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्णपंक्ती  म्हणतात .
   
आंशिक परावर्तन 

                               जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याचे आंशिक रुपात परावर्तन होते म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो.ह्यास आंशिक परावर्तन  असे म्हणतात


Comments

  1. अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेमध्ये प्रकाशाचे अपवर्तन ची संकल्पना मांडली आहे.

    ReplyDelete
  2. This is so cool! I never knew that light could bend when it travels between different mediums.

    ReplyDelete
  3. खूप उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रकाशाचे अपवर्तन

प्रकाशाचे अपवर्तन